‘जनता कर्फ्यू’चे दिवस वाढवणार; संजय राऊतांनी दिले संकेत

0

चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसचा फटका महाराष्ट्रालाही बसला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, महाराष्ट्रात कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. 63 वर्षीय व्यक्तीचा मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 74 वर गेली असून, मुंबई 6 आणि पुण्यात 4 नवीन रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे. रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंतही जनतेची संचारबंदी करण्यात आली आहे. मात्र आजचा जनता कर्फ्यू 8 दिवसांपूर्वीच कठोरपणे लादायला हवा होता असं मत शिवसेनेचे दिग्गज नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here