मुंबई इंडियन्सचा ‘हा’ युवा खेळाडू भारतीय संघात एंट्री करण्याची शक्यता, सुनील गावस्करांनी दिला पाठिंबा

0

मुंबई : सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्सचा संघ हा आयपीएलच्या बाहेर गेला आहे. पण मुंबई इंडियन्सच्या एका खेळाडूने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. त्यामुळे हा युवा खेळाडू मुंबई इंडियन्समधून थेट भारतीय संघात पाहायला मिळू शकतो. या खेळाडूला आता भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्करांनीही पाठिंबा दिला आहे.

मुंबई इंडियन्सच्या संघावर या हंगामात नामुष्की ओढवली. पण मुंबई इंडियन्सच्या संघाला यावेळी एक हिरा मिळाल्याचे पाहायला मिळाले. मुंबईच्या संघाने लिलावात भारताच्या १९ वर्षांखालील संघातील तिलक वर्माला संधी दिली आणि तो या हंगामात मुंबई इंडियन्ससाठी हुकमी एक्का ठरत असल्याचे पाहायला मिळाले. कारण तिलक वर्मा हा सातत्याने धावा करत असल्याचे पाहायला मिळत आहे. पण तिलकला यावेळी मुंबईच्या अन्य खेळाडूंची चांगली साथ मिळाली नाही आणि हेच मुंबईचा संघ आयपीएलबाहेर जाण्यामागचे एक कारण आहे. १९ वर्षांच्या तिलकने आतापर्यंतच्या १२ सामन्यांमध्ये ३६८ धावा केल्या आहेत.

सुनील गावस्कर यांनी सांगितलं की, ” चेन्नईविरुद्धच्या सामन्यात जेव्हा तिलक फलंदाजीला उतरला होता तेव्हा मुंबईवर जास्त दडपण होते. पण ही परिस्थिती त्याने चांगल्या पद्धतीने हाताळल्याचे पाहायला मिळाले. कारण यावेळी तिलकने पहिल्यांदा एकेरी-दुहेरी धावांवर जास्त भर दिला आणि स्ट्राइक रोटेट केली. क्रिकेटमध्ये ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे. पण एकदा स्थिरस्थावर झाल्यावर मात्र त्याच्याकडून दमदार फलंदाजी पाहायला मिळाली. तिलकच्या भात्यामध्ये भरपूर फटके आहेत. त्याचबरोबर त्याला क्रिकेटची चांगली माहिती आहे, त्याचबरोबर नेमकं कधी काय करायचं, हे त्याला चांगलं कळतं. त्यामुळे तिलक हा भारतीय संघातही खेळू शकतो. रोहित शर्मानेदेखील त्याची स्तुती केली होती आणि ती योग्यच होती. कारण रोहितने त्याचा खेळ जवळून पाहिला आहे आणि त्याला जर तिलक हा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळू शकतो, असे वाटत असेल तर तो योग्यच आहे. “

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:51 PM 17-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here