करोनामुळे भविष्यात अनेक आर्थिक त्रासाला सामोरे जावं लागणार आहे. पण आता प्राण आणि देश वाचवण्याची गरज आहे. देश आणि प्राण वाचवायचा असेल तर आर्थिक मंदीची झळ सोसण्याची तयारी ठेवावी लागेल. नुसतं भारत माता की जय आणि वंदे मातरम म्हणणे म्हणजे राष्ट्रभक्ती नाही. तर अशी झळ सोसणारा व्यक्तीच खरा राष्ट्रभक्त असतो. त्यामुळे आर्थिक त्रास सहन करण्याची तयारी ठेवली पाहिजे. असं परखड मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.
