चिपळूण येथे ‘हिंदू एकता दिंडी’

0

चिपळूण : सनातन संस्थेच्या वतीने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अखंड कार्यरत असलेले सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण भारतात हिंदु राष्ट्र-जागृती अभियान राबवले जात आहे.

या अभियानाचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील चिपळूण येथे १५ मे या दिवशी दुपारी ३.३० वाजता ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली. यामध्ये विविध संप्रदाय, संघटना, हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी, साधक आदी मिळून १ सहस्त्र ४०० जण सहभागी झाले होते
हिंदू एकता दिंडीला श्री विरेश्वर मंदिरसमोरील चौकातून धर्मध्वजपूजनाने प्रारंभ झाला.

प्रारंभी जय हनुमान मित्रमंडळ, ओझरवाडी, चिपळूणचे अध्यक्ष आणि माजी सैनिक श्री. अशोक घेवडेकर यांनी धर्मध्वजाचे पूजन केले, तर इस्कॉनचे श्री. सूर्यकांत आंब्रे यांनी धर्मध्वजाला पुष्पहार घातला. यानंतर स्वयंसिद्ध दत्ताधिष्ठान पातेपिलवलीचे पू. संतोष महाराज वनगे यांनी धर्मध्वजाला श्रीफळ अर्पण केले. नंतर सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी पालखीतील भगवान परशुराम आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या प्रतिमांचे पूजन केले.

नंतर दिंडीला प्रारंभ होऊन दिंडी बाजारपेठमार्गे श्री वेस मारुती मंदिर येथे आल्यानंतर तेथे दिंडीचे सभेत रूपांतर झाले. दिंडीमध्ये रणरागिणी पथक, वारकरी संप्रदाय, सनातन संस्थेचे पथक, नऊवारी साडी नेसलेल्या सुवासिनींचे डोक्यावर कलश घेतलेले पथक, ‘इस्कॉन’चे भक्त मंडळ, प्रथमोपचार पथक, सुराज्य अभियान पथक, आरोग्य साहाय्य समितीचे पथक, सनातन संस्थेचा बालकक्ष असे दिंडीचे स्वरूप होते. दिंडीमध्ये हातात भगवा ध्वज घेऊन विविध घोषणा देत सनातनचे हितचिंतक आणि विविध संप्रदायांचे अनुयायी सहभागी झाले होते. नगरपरिषदेसमोर चिपळूणच्या माजी नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे यांनी धर्मध्वजाला पुष्पहार अर्पण केला. गांधी चौक येथे उद्योजक अमोल जोगळेकर आणि अमित जोशी यांनी धर्मध्वजाचे पूजन केले. तेथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष श्री. निखिल किल्लेकर यांनी पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. परेश गुजराथी यांनी केले.

ओझरवाडी येथील शिवध्वनी ढोल ताशा पथकाचे श्री. सूरज नवरत आणि सहकारी यांनी दांडपट्टा, लाठीकाठी यांची प्रात्यक्षिके दाखवली. तसेच हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनीही लाठीकाठी आणि दंडसाखळी यांची प्रात्यक्षिके दाखवली.हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतांना छत्रपती शिवराय आणि मावळे देखावा असलेला दापोली येथील धर्मप्रेमींचा चित्ररथ, श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थान गोशाळा, लोटेचा गाय-वासरू आणि श्रीकृष्ण असलेला चित्ररथ यांसह तसेच श्री. पराग ओक हे वासुदेवाच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. सावर्डे नांदगाव येथील ह.भ.प. दत्ताराम महाराज मुंडेकर, ह.भ.प. अनंत रसाळ हे वारकरी दिंडीसह सहभागी झाले होते. अखिल भारतीय कच्छ कडवा पाटीदार समाजाने सरबत व्यवस्था केली.या दिंडीत विविध संप्रदाय व संघटनांचे मान्यवर उपस्थित होते. सनातन संस्थेचे संत पू. चंद्रसेन मयेकर, पू. श्रीकृष्ण आगवेकर आणि पू. स्नेहलता शेट्ये यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:34 AM 18-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here