कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तानवर आली भिक मागण्याची वेळ

0

इस्लामाबाद : दहशतवाद्यांना पोसण्यासाठी लाखो कोटी रुपये उधळणाऱ्या पाकिस्तानची कोरोना व्हायरसमुळे चांगलीच जिरली आहे. जगभरात कोरोनाला रोखण्यासाठी बाजारपेठा, शाळा, मॉल, हॉटेल बंद ठेवण्यात येत असताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तसे करू शकत नसल्याचे म्हटले आहे. असे केल्यास आधीच महागाईने त्रस्त असलेले लोक उपाशी मरतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. पाकिस्तानची अर्थव्यवस्था आधीच डबघाईला आलेली आहे. एवढी की पाकिस्तानी पंतप्रधानाला सामान्य प्रवाशांप्रमाणे प्रवासी विमानातून परदेश दौरे करावे लागत आहेत. सरकारी वाहने विकावी लागत आहेत. विकासासाठी, दहशतवादाविरोधात आलेला निधी या देशाने भारताविरोधात दहशतवाद्यांची निर्मिती आणि त्यांचे पालन पोषण करण्यासाठी वापरल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. पाकिस्तानी लोकांचे रोजचे जेवणाचे वांदे झालेले असतानाही पाकिस्तान कोरोनाच्या आशियाई देशांच्या बैठकीत काश्मीरबरच बोलत होते. आता कोरोनामुळे पाकिस्तानचे कंबरडे मोडले असून इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमू कुरेशी यांनी कर्ज परतफेडीमध्ये दिलासा देण्याची मागणी केली आहे. डॉन न्यूजसोबत बोलताना कुरेशी यांनी सांगितले की, पाकिस्तानसारख्या गरीब देशाला कोरोना व्हायरसविरोधात लढाई करणे सोपे नाही. पाकिस्तानवर खूप मोठे परदेशी कर्ज आहे. यामुळे आम्हाला जगातील मोठे देश आमि अर्थ संस्थांनी मदत करण्याची गरज आहे. त्यांनी पुढे यावे. पाकिस्तानवीर कर्ज काही प्रमाणात माफ केले जावे. यासाठी जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री हेईको मेस यांच्याशी बोलणे झाले असल्याचे ते म्हणाले. दरम्यान शनिवारी सायंकाळपर्यंत पाकिस्तानात एकूण ६५३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानमध्ये क्रिकेट स्टेडियम, शाळा, कॉलेज, यूनिवर्सिटी बंद करण्यात आल्या आहेत. अन्य देशांपेक्षा पाकिस्तानला कोरोनाचा धोका सर्वाधिक आहे. कारण या देशाच्या सीमा खुल्या आहेत. कोणीही आत-बाहेर करू शकते. तसेच येथील हॉस्पिटलची अवस्थाही केविलवाणी आहे. हात जोडण्यापेक्षा गळाभेट घेण्यात येथील जनतेला चांगले वाटते. लाखोंच्या संख्येने लोक अशिक्षित आहेत. तसेच देशाची आर्थिक स्थितीही चांगली नाही. या साऱ्यामध्ये अडकल्याने गर्दीची ठिकाणे बंद करण्यात येणार नाहीत. कोरानाचे संकट ओढवल्यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्‍ट्रपती आरिफ अल्‍वी यांना चीनकडे मदतीसाठी पाठवले होते. चीनवर कोरोनासंकट ओढवल्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या देशाचे राष्ट्रपती चीन दौऱ्यावर गेले आहेत. एवढेच नाही, तर राष्‍ट्रपति अल्‍वी यांचाही हा पहिलाच चीन दौरा आहे. पाकिस्तानी सैन्याला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तेथील स्थानिक मिडीयानुसार पाकिस्तानी सैन्याचे कमीतकमी आठ अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. यामध्ये तीन लेफ्टनंट कर्नल, दोन कर्नल, दोन ब्रिगेडिअर आणि एक मेजर जनरल रँकचे अधिकारी आहेत. ही माहिती पाकिस्तानी आरोग्य मंत्रालयानेच दिली आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here