मध्यप्रदेशचा निर्णय ४ दिवसात कसा बदलला ? : नाना पटोले

0

नागपूर : ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे आदेश आणि हायकोर्टातील सुनावणीनंतर आपल्याला बोलता येईल, असं नाना पटोले म्हणाले. महाराष्ट्रातील भाजपच्या मताशी सहमत होण्याचं कारण नाही. सुप्रीम कोर्टाचा चार दिवसांपूर्वीचा निकाल आणि त्यापूर्वीचा महाराष्ट्राचा निकाल यात फरक नव्हता. इम्पिरिकल डाटा, ट्रिपल टेस्टचं मत मांडलं जात होतं. चार दिवसात कसा फरक पडला हा परिक्षणाचा भाग आहे. महाराष्ट्र भाजप आरोप प्रत्यारोपावर आली हे बरोबर नाही. सुप्रीम कोर्टाच्या निकालात काय म्हटलं हे पाहिल्याशिवाय बोलता येणार नाही, असं नाना पटोले म्हणाले.

महाराष्ट्रालाही न्याय मिळेल, ओबीसी आरक्षणासह निवडणुका होतील : छगन भुजबळआमचा मुद्दा तोच आहे, नेमकी त्यांची ट्रिपल टेस्ट कशी झाली. चार दिवसात हा प्रकार कसा घडू शकतो. महाराष्ट्र सरकारनं देखील आमचं काम सुरु असल्याचं सांगितलं होतं. सुप्रीम कोर्टाचा निकाल वाचूनचं यावर आम्ही बोलू, असं नाना पटोले म्हणाले. मध्य प्रदेशनं ट्रिपल टेस्ट केली आणि महाराष्ट्र सरकार करत नसेल तर आम्ही जाब विचारु, असं नाना पटोले म्हणाले. बांठिया आयोगाचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकाराची भूमिका आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल वाचल्यानंतर योग्य प्रतिक्रिया देऊ, असं नाना पटोले म्हणाले.

भाजपच्या बालिशपणाला तोड नाही. हनुमान चालिसा वाचायचा त्याचा वेगळा अर्थ लावायाचा, अशी त्यांची परिस्थिती आहे. मी मंत्री नाही तरी माझा राजीनामा मागतात हा भाजपचा बालिशपणा आहे. मी सुप्रीम कोर्टाचा निर्णय वाचूनचं बोलू, असं नाना पटोले म्हणाले. प्रभाग रचनेबद्दल आमचे स्थानिक नेते कोर्टात गेलेले आहेत. त्यामुळं मला काय बोलायचं नाही, असं नाना पटोले शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यासंदर्भात विचारेल्या प्रश्नावर म्हणाले.

सचिन सावंत काय म्हणाले?
महाराष्ट्र काँग्रेसचे माजी प्रवक्ते सचिन सावंत यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा दाखला देत त्याचं मत व्यक्त केलं आहे. एक फोटो ट्विट करत सचिन सावंत यांनी “याचा सरळ सरळ अर्थ हा की माननीय सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश मागासवर्गीय आयोगाने सादर केलेला अहवाल हा अचूक आहे, असे म्हणण्यास नकार दिला आहे.”, म्हटलं आहे. तरीही निवडणूक घेण्यास तात्काळ परवानगी दिली आहे. आजकालचे निकाल समजण्यासाठी आम्हाला अधिक अभ्यासाची आवश्यकता आहे असे दिसते, असंही सचिन सावंत म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:00 PM 18-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here