एक दिवस कान्स भारतात होईल : दीपिका पदुकोण

0

‘कान्स फिल्म फेस्टिवल’ला आता सुरुवात झाली आहे. जगभरातील अनेक दिग्गल कान्स फिल्म फेस्टिवल’ला हजेरी लावत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण 75 व्या ‘कान्स फिल्म फेस्टिवल’मध्ये मुख्य ज्यूरीचा भाग असण्यासोबत कान्सच्या रेड कार्पेटवर तिच्या सौंदर्याचा जलवादेखील दाखवणार आहे. ‘कान्स फिल्म फेस्टिवल’च्या उद्धाटना दरम्यान दीपिका म्हणाली, एक दिवस कान्स भारतात होईल.”

दीपिका म्हणाली, कान्स फिल्म फेस्टिवल’ला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. तसेच भारतदेखील स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. भारताला ‘कान्स फिल्म फेस्टिवल’मध्ये ‘कंट्री ऑफ ऑनर’चा सन्मान मिळाला आहे. 15 वर्षांपूर्वी मी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता 15 वर्षांनंतर ‘कान्स फिल्म फेस्टिवल’च्या मुख्य ज्यूरीचा भाग असणं आणि भारताचं प्रतिनिधित्व करणं या सगळ्याच गोष्टी खूप अभिमानास्पद आहेत.

17 ते 28 मे दरमम्यान पार पडणार ‘कान्स चित्रपट महोत्सव’
‘कान्स चित्रपट महोत्सव’ हा सर्वात मोठा महोत्सव मानला जातो. यंदा 17 ते 28 मे दरम्यान 75 वा कान्स चित्रपट महोत्सव होणार आहे. तसेच यंदाच्या महोत्सावाची खासियत म्हणजे या महोत्साव स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होणार आहे. यंदाच्या कान्स चित्रपट महोत्सावात वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी ‘कान्स चित्रपट महोत्सवा’त हजेरी लावत आहेत.

‘कान्स’ चित्रपट महोत्सवात तीन भारतीय सिनेमांनी मारली बाजी
कान्स चित्रपट महोत्सवात तीन भारतीय सिनेमांनी बाजी मारली आहे. पोटरा’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘तिचं शहर होणं’ या तीन मराठी चित्रपटांची कान्स आंतरराष्ट्रीय महोत्सवात निवड झाली आहे. फ्रेंच अभिनेता व्हिन्सेंट लिंडन यांच्या अध्यक्षतेखालील 75व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी 8 सदस्यीय ज्युरींमध्ये दीपिका पदुकोणची निवड करण्यात आली आहे. चित्रपट महोत्सवात अभिनेत्री दीपिका पदुकोण ज्युरी म्हणून दिसणार आहे. तर सत्यजित रे यांचा ‘प्रतिद्वंदी’ हा सिनेमा यंदा कान्स चित्रपट महोत्सवात दाखवला जाणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:56 PM 19-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here