रत्नागिरी: राज्यात १४४ कलम लागू झाले आहे. एका ठिकाणी पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई आहे. धार्मिक स्थळांना देखील हा नियम लागू करण्यात आला असून सर्वांनी मानवजातीच्या आरोग्याच्या दृष्टीने याचे पालन करणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने उद्या दिनांक २३ मार्च रोजी ना. उदय सामंत मुस्लीम समाजातील प्रमुखांशी संवाद साधणार आहेत. ना. उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून तेथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात हा संवाद साधणार आहेत.
