आयपीएल फायनलच्या वेळेत बदल

0

मुंबई : आयपीएलची फायनल ही २९ मे या दिवशी अहमदाबादला होणार आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. पण आता आयपीएलच्या फायनलची वेळ बदलण्यात आली आहे. आता आयपीएलची फायनल ही अन्य सामन्यांसारखी रात्री ७.३० वाजता सुरु होणार नाही, अशी माहिती मिळाली आहे.

आयपीएलची फायनल यावेळी मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. आयपीएलचे सर्व सामने हे रात्री ७.३० वाजता सुरु होतात. पण आयपीएलची फायनल मात्र आता उशिरा सुरु होणार आहे. कारण आयपीएलच्या फायनल सामन्यापूर्वी आता पारंपरिक सांगता सोहळा रंगणार आहे. या सोहळ्यात बॉलीवूडचे कलाकार सहभागी होणार आहेत. हा सोहळा संध्याकाळी ६.३० मिनिटांनी सुरु होणार आहे. हा सोहळा जवळपास ५० मिनिटे चालणार आहे, म्हणजेच हा सोहळा ७.२० वाजता संपणार आहे. त्यानंतर १० मिनिटांचा ब्रेक घेण्यात येणार आहे. या ब्रेकनंतर ७.३० मिनिटांनी टॉस करण्यात येणार आहे. टॉसनंतर पुन्हा एकदा अर्ध्या तासाचा ब्रेक घेण्यात येणार आहे. त्यामुळे आयपीएलचा अंतिम सामना ७.३० ऐवजी आता रात्री ८.०० वाजता सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

गेली काही वर्षे आयपीएलचा समारोप सोहळा करण्यात आला नव्हता. या आयपीएलमध्ये उद्घाटन सोहळाही करण्यात आला नाही. कारण आयपीएची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा वातावरण करोनाने ग्रासलेले होते. त्यावेळी फक्त २५ टक्के क्षमतेएवढीच एंट्री चाहत्यांना स्टेडियममध्ये देण्यात आली होती. त्यानंतर वातावरण बदलले आणि बऱ्याच सकारात्मक गोष्टी समोर आल्या. त्यामुळे स्टेडियममधील आसन क्षमता ही ५० टक्के एवढी करण्यात आली. आता तर आयपीएलच्या अंतिम फेरीसाठी १०० टक्के आसन क्षमता ठरवण्यात आली आहे. त्यामुळे आयपीएलच्या अंतिंम फेरीसाठी मोटेराचे नरेंद्र मोदी स्टेडियम हे पूर्णपणे भरलेले असणार आहे. सध्याच्या घडीला आयपीएलचा ज्वर टिपेला पोहोचला आहे, कारण सध्या प्ले ऑफची रेस रंगात आलेली आहे. त्यामुळे आता अंतिम फेरीत कोण पोहोचणार, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:51 PM 19-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here