कॉंग्रेसच्या वाणिज्य व उद्योग विभाग प्रदेश महासचिव पदी प्रशांत यादव यांची निवड

0

चिपळूण : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वाणिज्य व उद्योग विभागाच्या मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र विभागीय महासचिव पदावर चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांची निवड करण्यात आली आहे.

वाणिज्य व उद्योग विभागाच्या महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जनक व्यास यांनी यादव यांना याबाबतचे नियक्तिपत्र दिले आहे. या निवडीबद्दल यादव यांचे अभिनंदन होत आहे.

पक्षाने फार मोठी जबाबदारी दिली आहे. या सेलमध्ये काम करायला संधी दिल्याबद्दल पक्षाच्या सर्व नेत्यांचे आभार. या सेलच्या माध्यमातून कोकणात पर्यावरणपूरक व्यवसाय आणण्याच्या दृष्टीने भर दिला जाईल आणि इथल्या उद्योगधंद्यांना काँग्रेस पक्षाच्या आणि वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून अधिक प्रमाणात शासनाची मदत मिळवून देण्याच्या संदर्भात काम करण्याचा मानस आहे. तालुकाध्यक्षपदावर काम करताना पक्षसंघटना वाढीसाठी प्रामाणिकपणे काम करत आहे. नव्या जबाबदारीमुळे या पक्षवाढीच्या कामातही अधिक बळ मिळेल. अर्थातच आतापर्यंत काम करताना ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांची साथ मिळाली, तशीच साथ यापुढेही राहील, असा विश्वास चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह जनक व्यास, काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अनिल पाटील, उपाध्यक्षा जयश्री पाटील आदींनी यादव यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:11 PM 20-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here