देवडे येथील आकांक्षा कदमने पटकावले राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचे विजेतेपद

0

देवरूख : मुंबई-बोरिवली येथील मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या ७ व्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचे अंतिम विजेतेपद संगमेश्वर तालुक्यातील देवडे येथील आकांक्षा कदम हिने पटकावले.

सलग तिसरी राज्य स्पर्धा विजयी होण्याचा मान तिने मिळवला. आकांक्षाने मुंबईच्या मिताली पिंपळेला तीन सेटमध्ये हरवत हे विजेतेपद प्राप्त केले.

या स्पर्धेच्या देवरूख : विजेत्या चषकासह उपांत्य फेरीत मुंबईच्या काजल आकांक्षा कदम. कुमारी हिचा २५-२४, १८-१२ व १२-११ अशा सेटमध्ये पराभव केला. यात महिला स्पर्धेची तीन वेळा अंतिम फेरी गाठून विजय संपादन केला आहे.

यापूर्वी आकांक्षाने सिंधुदुर्ग सावंतवाडी येथे पहिली व दुसरी जिमखाना दादर व सध्या तिसरी मंडपेश्वर बोरिवली अशाप्रकारे स्पर्धा जिंकली आहे. आकांक्षाला तिचे प्राध्यापक, आई-वडील, मामा आंतरराष्ट्रीय कॅरमपटू संदीप देवरूखकर यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल सर्वस्तरावरून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here