राजापूरात राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

0

राजापूर : शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रतीक मटकर (पंचायत समिती सदस्य), दयानंद चौगुले (राष्ट्रवादी विभाग अध्यक्ष), मनीष लिंगायत (रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष), जितेंद्र वेताळे (राष्ट्रवादी बूथ कमिटी अध्यक्ष ओणी), समीर तुळसणकर (राष्ट्रवादी युवक अध्यक्ष ओणी), सचिन टाकळे या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी हाताला शिवबंधन बांधून आणि भगवा झेंडा खांद्यावर घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची ओणी विभागासह राजापूर तालुक्यात ताकद वाढली आहे.

आज पुन्हा एकदा पंचायत समिती सदस्यांनी शक्ती प्रदर्शन करत शिवसेना सचिव, शिवसेना लोकसभा गटनेते, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत व राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी तसेच माजी जिल्हा संपर्कप्रमुख पांडुरंग उपळकर, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, उप तालुकाप्रमुख विश्वनाथ लाड, विभागप्रमुख वसंत जडयार, माजी जिल्हा अर्थ व शिक्षण सभापती शरद लिंगायत, विभागीय संघटक उमेश पराडकर, उप विभागप्रमुख सुरेश मासये, महिला आघाडी मीनल गोरुले, सुनीता राजापकर, युवासेना गौरव सोरप, वाटूळ सरपंच अभय चव्हाण यांच्या उपस्थित 500 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

या पक्ष प्रवेशाच्या माध्यमातून विरोधकांना इशारा देण्यात आला आहे. शिवसेना पक्ष आणि पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विचार, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी याच्या काम करण्याच्या पद्धतीने प्रभावित होऊन शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केल्याचे माजी पंचायत समिती सदस्य प्रतीक मटकर आणि सहकाऱ्यांनी स्पष्ट केले.

खरवते सरपंच दिनेश चौगुले, विठ्ठल शेलार उप तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी, गौतम जाधव, प्रियांका जाधव ग्रामपंचायत सदस्या वडवली, ओनी नितीन जडयार, वडवली ग्रामपंचायत मधील गौतम जाधव, समीर तुळसणकर, जितू वेताळे, मनीष लिगायत, नितीन जडयार, जितू वेताळे, मंगेश नागम कोंडीवळे बूथ प्रमुख, राजेश पालकर, श्रीधर नेवरेकर, शिवाजी मस्ये मंदरूळ, वडद हसोळं प्रकाश पळसमकर, अरविंद पळसमकर, चंद्रकांत पळसमकर, शांताराम नमसले, महादेव जडयार, शिवाजी मिरजुळकर, मंदार गितये, कोंडीवले मधील मंगेश नागम, राजेश पालकर, श्रीधर नेवरेकर, मंदरूळ शिवाजी मासये, वाटूळ धावडे, दिलीप चौगले सदस्य ग्रामपंचायत, वैशाली माटल सदस्य, महादेव चौगुले गावकर, श्रीधर चौगुले गावकर, रामचंद्र भारती गावकर, लक्ष्मण भिकने, गावकर, सुरेश चौगुले हेदाडवाडी, संतोष चौगुले, धनाजी कातकर, वैशाली माटल, व अन्य ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यावेळी ओणी पंचायत समिती चे उपविभागप्रमुख म्हणून दयानंद चौगुले यांची निवड खासदार विनायक राऊत यांनी केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:27 PM 20-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here