बेकायदा जमाव करून आदेशाचा भंग केल्याप्रकरणी रत्नागिरीत १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0

रत्नागिरी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जमावबंदी आदेश असताना सर्व सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र हा आदेश धुडकावत मिरकरवाडा येथे बेकायदा जमाव करून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जमाव बंदीबाबत पोलिसांनी शहर परिसरातील, मंदिरे, मशिदी, व धार्मिक स्थळांना भेटी देवुन तेथील मौलवी, ट्रस्टी यांना समक्ष माहिती यापूर्वीच दिली होती तसेच याबाबत जनजागृती देखील करण्यात आली होती. बेकायदेशिर जमाव करुन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात भा . द . वि . क १४३,१४९,१८८ , महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ ( १ ) ( ३/१३५) , साथ रोग प्रतिबंधक अधिनियम १८९७ चे कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here