शिवसेना जिल्हा ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी पांडुरंग उपळकर यांची नियुक्ती

0

राजापूर : शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हा माजी संपर्कप्रमुख पांडुरंग उपळकर यांची शिवसेनेच्या रत्नागिरी जिल्हा (दक्षिण)
ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याची घोषणा पक्षाचे सचिव, खासदार विनायक राऊत यांनी ओणी येथील पक्षाच्या कार्यक्रमादरम्यान केली.

शिवसेनेची राजापूर तालुक्याची जबाबदारी मुंबईत सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये पांडुरंग उपळकर सदैव अग्रस्थानी राहिले आहेत. राजापूर तालुका संपर्कप्रमुख पदासह रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुखपदी पांडुरंग उपळकर यांची नियुक्ती सेनेकडून
करण्यात आली होती. त्यांनी या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या.

ओणी येथील शिवसेनेच्या एका कार्यक्रमादरम्यान या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी अभिनंदन केले. खासदार राऊत यांच्या हस्ते उपळकर यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी आमदार राजन साळवी, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, माजी जि.प.सभापती शरद लिंगायत, माजी उपसभापती विनोद शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य प्रतिक मठकर, उपतालुकाप्रमुख विश्वनाथ लाड, विभागप्रमुख वसंत जड्यार उपस्थित
होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:26 AM 21-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here