चिपळुण मध्यवर्ती एसटी स्थानकासमोरील झाड कोसळले

0

चिपळूण : शुक्रवारी पहाटे मान्सूनपूर्व पावसाने शहर परिसरात सलामी दिली. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या वळवाच्या पावसाने थोडासा दिलासा दिला. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पहाटेच्या सुमारास शहर परिसरात जोरदार पाऊस झाला.

दरम्यान, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शहरातील मध्यवर्ती एस.टी. स्थानकासमोरील वाहनतळाच्या ठिकाणी गुलमोहोराचे झाड कोसळून तेथील कुंपणाचे नुकसान झाले. याचदरम्यान वीजपुरवठा खंडित झाल्याने पहाटेच्या सुमारास नागरिकांची झोपमोड झाली.

या वर्षी मोसमी पाऊस ८ दिवस आधीच दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यानुसार मोसमी वारे मार्गक्रमण करीत आहेत.

या पार्श्वभूमीवर चिपळूण परिसरात हंगामपूर्व पावसाने हजेरी लावली. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास वारा आणि विजांच्या लखलखाटासह जोरदार पाऊस झाला. या वेळी महावितरणने शहर परिसरातील वीजपुरवठा खंडित केला. मुंबई-गोवा महामार्गावर चौपदरीकरणा अंतर्गत सुरू असलेल्या काही ठिकाणी या पावसाचे पाणी साचले. पहाटेच्या वेळी अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची झोपमोड केल्यामुळे आता पावसाळ्यापूर्वीची कामे उरकून घेण्यासाठी लगबग वाढली आहे.

दरम्यान, शहर बाजारपेठेत प्लास्टिक, नायलॉन दोऱ्या विकणारे विक्रेते दाखल झाले असून बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होत आहे. पडून गेलेल्या पावसामुळे दिवसभर वातावरणात उकाडा निर्माण झाला. तसेच पूर्ण दिवस भर ढगाळ वातावरण होते. वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसाने शहरातील मध्यवर्ती एसटी स्थानकासमोरील वाहनतळाच्या ठिकाणी गुलमोहोराचे झाड कोसळले. यामुळे कुंपणाचे नुकसान झाले. या पावसाने अन्यत्र मोठे नुकसान झाल्याची नोंद नाही. काही ठिकाणी मात्र रस्त्यावर माती आल्याने रस्ता निसरडा झाला होता. विशेष करून मुंबई-गोवा महामार्गावर पावसामुळे माती रस्त्यावर आल्याने अनेक ठिकाणी वाहनांना अडचणींना सामोरे जावे लागले. रस्ता निसरडा झाल्याने वाहतूक काही काळ धीम्या गतीने सुरू होती.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:43 AM 21-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here