चिपळूणला यंदाही महापुराचा धोका..?

0

चिपळूण : गेल्या चार महिन्यांपासून वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ४ लाख ४५ हजार घनमीटर गाळ उपसा करण्यात आला असला तरी हजारो घनमीटर गाळ हा प्रत्येक ठिकाणी किनाऱ्यावरच आहे.
हा गाळ न उचलल्यास पावसाळ्यात शहर व परिसराला पुन्हा महापुराचा त्रास सहन करावा लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तवर्षी आलेल्या महापुरामुळे चिपळुणात कोट्यवधींचे नुकसान झाले. अतिवृष्टी, कोयनेचे अवजल आणि समुद्राला आलेली भरती या कारणाने येथे महापूर आला. यामध्ये ९० टक्के शहर पाण्याखाली गेले. यानंतर नागरिकांमध्ये उठाव निर्माण झाला. वाशिष्ठी व शिव नदीतील गाळ काढावा, या मागणीला जोर धरला. अखेर नागरिकांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत शासनाने गाळ काढण्यासाठी दहा कोटी रुपये मंजूर केले.

जानेवारी महिन्यापासून गाळ काढण्याचे काम सुरू आहे. मात्र, अद्याप ते पूर्ण झाले नसून पन्नास टक्केच गाळ काढण्यात आला आहे. काढलेला गाळ अनेक ठिकाण वाशिष्ठी नदीच्या काठावरच रचून ठेवलेला दिसत आहे. यामुळे अतिवृष्टीत गाळ पुन्हा नदीत पुन्हा वाहून जाणार आहे. त्यामुळे केलेल्या कामाचा उपयोग काय, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

चिपळूण बचाव समितीने बेमुदत उपोषण करून पूरप्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले. केंद्रस्तरापर्यंत पाठपुरावा करण्यात आला. शासनाने गाळ काढण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला, मात्र त्यानंतर बचाव समितीची पकड ढिली झाली आहे. या कामाचा आवश्यक तेवढा पाठपुरावा समितीकडून झाला नसल्याचे त्या कामातून पुढे येत आहे. काम ५० टक्क्यांपेक्षा कमी काम झाले आहे. त्यातही वाशिष्ठी आणि शिव नदीच्या पात्रालगत अनेक ठिकाणी गाळ किनाऱ्यावरच ठेवलेला दिसत आहे.

नाम फाउंडेशनचाही उत्साह मावळला?
नाम फाउंडेशनने मोठ्या उत्साहाने शिव नदीतील गाळ काढण्याचे काम सुरू केले. मात्र, अखेरच्या टप्प्यात त्यांचा हा उत्साह काहीसा मावळला असल्याचे वृत्त आहे. दोन्ही कामांकडे लक्ष द्यायला कोणी तयार नाही. त्यामुळे नदीकिनारी अनेक ठिकाणी गाळ तसाच पडून आहे. तो नेण्यासाठी कोणी तयार नाही व शहर परिसरात गाळ टाकण्यासाठी जागा शिल्लक नाही, अशी कारणे सांगितली जात आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:08 PM 21-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here