गुहागर : तालुक्यातील धोपावे गाव समुद्राच्या पाण्याने घेरले आहे. त्यामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. घरातील माणसे भीतीपोटी घर सोडून भर पावसात डोंगराचा आश्रय घेत आहेत. पावसाने ओली चिंब झालेली लहान मुले, महिला व पुरुषही उपवाशी पोटी दिवस काढत आहेत. सततच्या समुद्राच्या पाण्याने घरांच्या पायांची मजबुती कमी होऊन भविष्यात बेघर होण्याची वेळ येऊ शकते व अनेकांचे आनंदी संसार उघड्यावर पडू शकतात. तरी भविष्यातील हा धोका लक्षात घेऊन यावर काहीतरी ठोस उपाययोजना केली पाहिजे. गावाला संरक्षण भिंत दिली तर हा धोका टाळू शकतो. अशी मागणी गावकऱ्यांकडून होता आहे.
