रत्नागिरी जिल्ह्याच्या शहरी भागात जमावबंदी लागू, उद्यापासून घरातील एकच माणूस घराबाहेर पडू शकतो

0

रत्नागिरी: कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्याच्या शहरी भागात जमाव बंदी लागू करण्यात आली आहे. एका कुटूंबातील एकच व्यक्ती बाहेर जाऊ शकणार आहे. जिल्ह्यातील रेल्वेसह एसटी, खासगी गाड्यांना जिल्हा बंदी करण्यात आली आहे. आता जिल्हाभरात एसटी धावणार नाही. कोकण रेल्वेची वाहतूक देखील ३१ तारखेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. कुणीही कामाशिवाय बाहेर पडू नये असे आदेशजिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. बाहेर पडतानाही योग्य कारण देणे आवश्यक आहे. याच संचारबंदीची अमलबजावणी परिस्थितीनुसार ग्रामीण भागातही करण्यात येणार आहे. शहरातील किराणा माल, पेट्रोल पंपासह मेडीकल आणि भाजीपाल्याची दुकाने सुरु राहतील. उर्वरित सर्व दुकाने, हॉटेल बंद ठेवण्यात येणार आहे. किराणा मालाच्या दुकानांमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यासाठी होम डिलीव्हरी कशी देता येईल याबाबत प्रयत्न सुरु आहेत. दुचाकी चालकनांनी हेल्मेट घालूनच शहरात फिरावे असे आवाहन जिल्हाधिकारी मिश्रा यांनी केले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here