नारशिंगे गावात छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म सोहळा उत्साहात साजरा

0

रत्नागिरी : तालुक्यातील नारशिंगे गावात १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म सोहळा व छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचा ८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने छावा प्रतिष्ठान रत्नागिरीच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

छ. संभाजी महाराजांना अभिषेक, आरती, रक्तदान शिबिर, हळदीकुंकू, मान्यवरांचे सत्कार समारंभ असे कार्यक्रम घेण्यात आले होते. यावेळी ७० जणांना जाणिव विशेष सन्मान हा परस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते उदय बने, अभय खेडेकर, प्रतिक देसाई, रोहित मयेकर, संकेत देसाई, चंद्रकांत देसाई, प्रदीप शिवगण. दीप्ती वहाळकर, मानसी पाथरे, आदी उपस्थित होते.

या संपूर्ण कार्यक्रमाला ६४५ शिलेदार व रणरागीनींनी सहभाग नोंदवला होता. छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचे संस्थापक अध्यक्ष सुनील धावडे यांचा मंचावर सन्मान करण्यात आला.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचे शिलेदार सचिव समिर गोताड, खजिनदार गणेश कांबळे, कार्याध्यक्ष संतोष आग्रे, संघटक समिर धावडे, प्रवक्ता संगम धावडे, विद्यमान सदस्य संदेश धावडे, राहुल धावडे आदींनी मेहनत घेतली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:36 AM 23-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here