काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदी अनिरुद्ध कांबळे यांची निवड

0

चिपळूण : काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षपदावर काम करणारे संगमेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते अनिरुद्ध कांबळे यांची जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

त्यांना नुकतेच जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी नियुक्ती पत्र दिले. जिल्हाध्यक्ष लाड यांनी पक्षांतर्गत फेररचना सुरू केली आहे. त्यानुसार नवीन पदांसह नवीन नियुक्त्या सुरू झाल्या आहेत. संगमेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेसचे कार्याध्यक्ष कांबळे यांनी गेली तेरा वर्षे पक्षाची अनुसूचित जमातीच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर आता प्रदेश कमिटीवरून वरिष्ठ उपाध्यक्षपद म्हणून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here