अत्यावश्यक सेवेसह वृत्तपत्रे सुरू राहणार – जिल्हाधिकारी

0

रत्नागिरी : मुंबई, पुण्यातून नुकतेच जिल्ह्यात आलेल्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात १ हजार लोकांना क्वारंटाईन करून ठेवण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. जिल्ह्यात येणाऱ्या खासगी गाड्यांवर बंदी असून शहरी भागात संचार बंदी लागु करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. तसेच वृत्तपत्रे, वार्तांकन व वितरणाला कोणतीही अडचण नाही, पण पत्रकारांनी ओळखपत्र वापरावे व हेल्मेटचा वापर करावा. अत्यावश्यक सेवेसह वृत्तपत्रे सुरू राहणार, अशीही त्यांनी माहिती दिली.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here