‘मिशन सागर 2022’ अंतर्गत बसणी येथे हॉलीबॉल स्पर्धा

0

रत्नागिरी : पोलिसांच्या ‘मिशन सागर 2022’ अंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील बसणी येथे हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात आल्या.

परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक हृषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेमध्ये काळबादेवी, बसणी पंचक्रोशीतील 06 संघांनी सहभाग घेतला. त्यामध्ये प्रथम विजेता काळबादेवी संघ, द्वितीय विजेता रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे, तृतीय क्रमांक सडये संघ यांना मिळालेला आहे.

विजेता उपविजेता संघांना रोख रक्कम, शिल्ड देवून गौरविण्यात आलेले आहे.

सदर स्पर्धा यशस्वी होणेसाठी सपोफो- शिवाजी इंदूलकर, पोहेकाँ- किशोर जोशी, पोना- राहुल पावसकर, पोलीस पाटील बसणी सौ प्रिया बंदरकर, पोलीस पाटील आरे श्री आदेश कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here