अरबी समुद्रापर्यंत पोहोचलेला मान्सून अडकला श्रीलंकेच्या वेशीवर

0

नवी दिल्ली : अरबी समुद्रात पोहोचलेल्या मान्सूनचा श्रीलंकेच्या वेशीवर खोळंबा झाला आहे. त्यामुळे भारतातील मान्सून
दाखल होण्याचा अंदाज हुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केरळमध्ये 27 मे रोजी मान्सून येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र, हा अंदाज हुकण्याची शक्यता आहे. कारण गेल्या तीन दिवसापासून मान्सून श्रीलंकेच्या वेशीवरच आहे. त्यामुळे पुढच्या टप्याचा प्रवास खोळंबला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यासाठी जूनचा पहिला आठवडा उजाडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आज पहाटे मुंबई आणि आसपासच्या परिसरात पाऊस झाला. त्याला मान्सून म्हणता येणार नाही. तो मान्सून पूर्व पाऊस आहे. गेल्या तीन दिवसांपासून मान्सून श्रीलंकेच्या किनारपट्टीवर अडकला आहे. त्यामुळे येत्या 27 मे रोजी केरळमध्ये दाखल होणाऱ्या मान्सूनला विलंब लागण्याची शक्यता आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यानंतर कोकणमार्गे मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल. त्यामुळे मान्सूनचे आगमन काहीसे लांबले आहे. मान्सूनला जरी विलंब लागणार असला तरी यंदा सकारात्मक पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

दरम्यान, 21 मे रोजी मान्सून अरबी समुद्रात दाखल झाला होता. दक्षिणेकडून प्रवास करत मान्सून अरबी समुद्रात आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर दाखल झाला होता. नियोजित वेळेपेक्षा सहा दिवस आधीच मान्सूनचे वारे सक्रीय झाले होते. त्यामुळे 27 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये तर 5 जूनपर्यंत मान्सून कोकणात पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. बंगालच्या उपसागराबरोबरच सध्या अरबी समुद्रातूनही जमिनीकडे बाष्पयुक्त वारे वाहत आहे.

भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात 5 जूनपर्यंत मान्सून सुरू होऊ शकतो. तर 12 जून ते 15 जून या कालावधीत संपूर्ण राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. मात्र. मान्सून सध्या श्रीलंकेच्या किनारपट्टीवर अडकला असल्याने भारतात मान्सून आगमनाला विलंब लागण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:21 AM 24-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here