रत्नागिरी : लाटांच्या माऱ्याने मिऱ्या कांबळेवाडी येथील बंधारा समुद्राने गिळंकृत केला इतकेच नव्हे तर लगतचा रस्ताही वाहून गेला. ज्या ठिकाणी हे भगदाड पडले तेथे तातडीने निर्णय घेवून पत्तन विभागाने रविवारी दुपारपासून मोठमोठे काळे दगड (क्वारी) टाकण्यास प्रारंभ केला आहे. जेणेकरून मोठमोठ्या लाटांच्या मान्याची क्षमता कमी होवून धोका नियंत्रणात राहण्यास मदत होणार आहे. शनिवारी समुद्रात उसळणाच्या वेगवान लाटांच्या मान्याने बंधा-याला भगदाड पडले. लगतचा रस्ताही समुद्राने आत ओढून घेतला. दोन नारळाची झाडेही गिळंकृत केली. त्यामुळे भरतीच्या वेळी येणा-या लाटांचे पाणी कांबळेवाडीतील घरांच्या दारात येवू लागले होते. मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि घोंगावणाच्या लाटांच्या मान्याच्या कर्कश आवाजामुळे शनिवारची रात्र या वाडीतील रहिवाशांनी जागून काढली. समुद्राचा धोका ओळखून जिल्हाधिका-यांनी पाहणी करून पतन विभागाला उपाययोजना करण्यास सांगितले. रविवारी म्हाडा अध्यक्ष आ.उदय सामंत यांनी पत्तन विभागाच्या अधिका-यांची बैठक घेवून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार दुपारपासूनच ज्या ठिकाणी बंधाच्याची मोठ्या प्रमाणात हानी झाली तेथे काळे दगड टाकण्यास सुरूवात केली. छोट्या दुरूस्त्याही सुरू झाल्या. पत्तन विभागाचे अभियंता एस.एस.चौधरी सुटीच्या दिवशीही या कामावर लक्ष ठेवून होते. शुक्रवारी सकाळी लाटांचे तांडव सुरू झाल्यानंतर कांबळेवाडी येथील घरामागचे दोन माङ समुद्रात उन्मळून पडले. समुद्राने माड़ गिळले तरी नारळ मात्र परत दिले. नारळाच्या पेंढीतील नारळ मुरगळून काढावे त्याप्रमाणे समुद्राच्या लाटांनी नारळ पेंढीपासून वेगळे झाले. हेच नारळ लाटांनी किना-यावर आले. किना-यावर आलेले हे नारळ तेथीलच रहिवाशांनी जमा केले. त्याच ठिकाणी काळ्या दगडाच्या मदतीने नारळाची सोडणं बाजूला करून सोललेले नारळ आपापल्या घरी नेले.
