टाळी एका हाताने वाजत नाही; ‘सामना’तून केंद्र सरकारवर घणाघात

0

कोरोनाबाबत महाराष्ट्र आता खऱ्या अर्थाने ‘डेंजर झोन’मध्ये आहे. बेफिकिरी फक्त जनतेच्या पातळीवर नाही, तर प्रशासकीय पातळीवरसुद्धा आहे. टाळी एका हाताने वाजत नसल्याचा हा दाखला. पंतप्रधान नरेंद्र मोदी एरवी ‘झटका’ निर्णय घेऊन सगळ्यांना आश्चर्यचकित करून सोडतात. नोटाबंदी करताना लोकांना एका मिनिटाचाही वेळ दिला गेला नव्हता. मग इतक्या गंभीर महामारीप्रसंगी वेळ का काढला गेला? रेल्वे आधीच का बंद केली गेली नाही?,’ असा प्रश्न शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून करण्यात आला आहे. मुंबईच्या रेल्वेवर सगळ्यात आधी बंदी आणायला हवी होती. पण रेल्वे प्रशासन त्यास तयार नव्हते. येथेही जी चूक इटली, जर्मनीत झाली तीच चूक आपण केली, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here