तारकर्ली मालवण बोट दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू; 7 जण उपचारार्थ दाखल; उपचारानंतर 11 जण घरी

0

सिंधुदुर्ग : मालवणमधील तारकर्ली येथे जय गजानन नावाची 20 पर्यटकांना घेऊन जाणारी बोट एमटीडीसी रिसॉर्ट येथे किना-यावर आणत असताना, ती बुडुन झालेल्‍या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्‍यू झाला. 7 जणांवर ग्रामीण रुग्‍णालय मालवण येथे उपचार सुरु असून 11 जणांना प्राथमिक उपचार देवून घरी पाठविल्‍याची माहिती ग्रामीण रुग्‍णालयाच्‍या वैद्यकीय अधीक्ष्‍ाकांनी दिली.

IMG-20220514-WA0009

आकाश भास्‍करराव देशमुख (वय 30 रा. शास्‍त्रीनगर अकोला), डॉ. स्‍वप्‍नील मारुती पिसे (वय 41 आळेफाटा पुणे) अशा 2 मृतांची नावे आहेत. रश्‍मी निशेल कासुल (वय 45 रा. ऐरोली, नवी मुंबई), यांच्‍यावर रेडकर हॉस्‍पीटल येथे, संतोष यशवंतराव (वय 38 बोरिवली, मुंबई), डॉ. अविनाश झांटये हॉस्‍पीटल येथे उपचार सुरु आहेत. तसेच मृणाल मनिष यशवंतराव (वय 8), ग्रंथ मनिष यशवंतराव (वय दीड वर्ष), वियोम संतोष यशवंतराव (वय- साडेचार वर्ष सर्व रा. बोरिवली मुंबई.) वैभव रामचंद्र सावंत (वय 40 रा. वायरी तारकर्ली), उदय भावे (वय 40 ऐरोली, नवी मुंबई ) यांच्‍यावर ग्रामीण रुग्‍णालयात उपचार सुरु आहेत.

शुभम गजानन कोरगावकर (वय 22) शुंभागी गजानन कोरगावकर, (वय 26 रा. दोघेही केरवडे, कुडाळ) लैलेश प्रदिप परब (वय 30), अश्विनी लैलेश परब (वय 30 रा. दोघेही कुडाळ). मुग्धा मनिष यशवंतराव (वय 40) मनिष यशवंतराव (वय 40) आयुक्‍ती यशवंतराव (31 रा. सर्व बोरिवली, मुंबई). सुशांत आण्‍णासो धुमाळे (वय 32), गितांजली धुमाळे (वय 28 रा. दोघेही जयसिंगपूर जि. कोल्‍हापूर). प्रियन संदिप राडे (वय 14 रा. प्रज्ञानंद नगर, पुणे), व सुप्रिया मारुती पिसे (वय 31 रा. पुणे) यांना प्राथमिक उपचार देवून घरी पाठविण्‍यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:38 PM 24-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here