रत्नागिरीत रंगणार श्री स्वामी समर्थ मंदिराचा तृतीय वर्धापन सोहळा

0

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील विठ्ठल मंदिराशेजारील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या तृतीय वर्धापन दिन २७ मे रोजी साजरा होणार आहे. यानिम्मित भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

IMG-20220514-WA0009

शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या श्री विठ्ठल मंदिराशेजारी अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांचे मंदिर उभारण्यात आले आहे. दिनांक २७ मे २०२२ रोजी ( वैशाख कृ || द्वादशी ) श्री स्वामी समर्थ मंदिराचा तृतिय वर्धापन दिन साजरा होणार आहे.

यानिमित आयोजित केलेले कार्यक्रम पुढीलप्रमाणे सकाळी ६.३० वा श्रींची समृद्ध पूजा , आरती , २१ व्यक्तिगत अभिषेक , दु . १२.३० वा . आरती . दु . १.०० वा महाप्रसाद , सायं . ५.३० वा . श्री स्वामी समर्थ महिला मंडळाच्याभजन भजनाचा कार्यक्रम होणार आहे. सायं . ७.०० वा . नित्य आरती, सायं . ७.३० वा . श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ, घुडे वठार यांच्या भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

ज्या भक्ताना वरील कार्यक्रमा निमित्त अन्नदान व अभिषेक करायचे असतील त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान गुरुवार दि . २६ मे २०२२ रोजी सकाळी ८.०० वा . एक दिवसाचे सामुदायीक पारायण होणार असून सर्व स्वामी भक्तानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर संस्थेने केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
8:26 PM 24-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here