▪ सर्व अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या देवदुतांचेही कौतुक
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, महाराष्ट्राला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोनाचा धोका टाळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिवसेंदिवस विविध नवीन निर्णय घेत आहे. उद्धव ठाकरेंच्या या कामावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कौतुक केले आहे. राज ठाकरे म्हणाले की, डॉक्टरावर हात उचलणाऱ्या लोकांना समजलं असेल की डॉक्टर किती महत्वाचे आहे, याची जाणीव झाली असेल. आज सर्व मंदिर, चर्च, मशीद, गुरुद्वार बंद आहेत. परंतु रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स, पोलीस, सरकारी कर्मचारी, केंद्र, राज्य सरकार आपले कर्तव्य बजावत आहे. त्याचे मी अभिनंदन करतो असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात रविवारी जनता कर्फ्यूचं आवाहन केले होते. नरेंद्र मोदी याचं आवाहन म्हणजे भारत बंद किंवा महाराष्ट्र बंद असा नव्हता. तर जनता कर्फ्यू म्हणजे, एक प्रकारची टेस्ट केस होती असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केले आहे.
