भारत-अमेरिकेची मैत्री जागतिक शांतता आणि स्थैर्यासाठी प्रभावी शक्ती : पंतप्रधान नरेंद्र मोदी

0

टोकियो : भारत आणि अमेरिकेदरम्यानचे संबंध हे खऱ्या अर्थाने विश्वासाची भागीदारी आहे. दोन्ही देशांदरम्यानची मैत्री जागतिक शांतता आणि स्थैर्यासाठी प्रभावी शक्ती म्हणून कायम राहील, असे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.

तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत अधिक समृद्ध, मुक्त आणि सुरक्षित जगासाठी काम करण्याचा संकल्पही मोदी यांनी व्यक्त केला. दोन्ही नेत्यांनी भारत-अमेरिका सुरक्षा आणि आर्थिक संपर्क अधिक दृढ करण्याची बांधिलकी व्यक्त केली. क्वाड शिखर परिषदेचे औचित्य साधून दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. भारत आणि अमेरिकेन मंगळवारी सुरक्षा संस्थेदरम्यान उदयोन्मुख आणि महत्त्वपूर्ण तंत्रशास्त्रामध्ये सहकार्य वाढविण्यासाठी मोठ्या भागीदारीची घोषणा केली.

मोदी यांनी अमेरिकी उद्योगाला भारतासोबत मेक इन इंडिया आणि स्वावलंबी भारत कार्यक्रमांतर्गत संरक्षण क्षेत्रातील उत्पादनासाठी भारताशी करण्यासाठी निमंत्रित केले. द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक सातत्याने विस्तारित होत आहे; परंतु क्षमतेपक्षा कमी आहे, असे मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमची सामाईक मूल्ये आणि सुरक्षेसाठी अनेक क्षेत्रांतील समान हित परस्परातील विश्वसाचे संबंध अधिक दृढ झाले आहेत. लोकांसोबतचे तसेच घनिष्ठ आर्थिक संबंधामुळे आमची भागीदारी अद्वितीय करते. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, द्विपक्षीय बैठकीचा निष्कर्ष ठोस फलनिष्पत्ती झाली. (वृत्तसंस्था)

उदयोन्मुख तंत्रशास्त्र उपक्रमाची घोषणा
द्विपक्षीय चर्चेनंतर नवी दिल्ली आणि वॉशिंग्टनने निष्कर्षभिमुख सहकार्यासाठी भारत-अमेरिकेचा महत्त्वपूर्ण आणि उदयोन्मुख तंत्रशास्त्र उपक्रम सुरू केल्याची घोषणा केली. या नवीन यंत्रणा भारतीय राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सह-नेतृत्वाखाली असेल.

भारत आणि अमेरिकेने दीर्घकालीन लस कृती कार्यक्रमाला २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.
भारत संयुक्त लष्करी फौज-बहरीनमध्ये एक सहयोगी सदस्य सामील होत असल्याची घोषणा व्हाइट हाउसने स्वतंत्रपणे केली.
भारत-अमेरिकेचा महत्त्वपूर्ण आणि उदयोन्मुख तंत्रशास्त्र उपक्रमाने कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम काॅम्प्युटिंग, ५-जी, ६-जी, बायोटेक, अंतराळ आणि सेमीकंडक्टर या क्षेत्रात दोन्ही देशांचे सरकार, शिक्षण आणि उद्योगांदरम्यान घनिष्ठ संबंध होतील.
व्हाइट हाउसने जारी केलेल्या निवेदनानुसार बायडेन यांनी युक्रेनविरुद्ध रशियाच्या युद्धाचा निषेध केला.
दोन्ही नेत्यांनी युद्धामुळे उद्भवलेल्या समस्या विशेषत: ऊर्जा आणि अन्नधान्याच्या भाववाढीची समस्या दूर करण्यासाठी कसे सहकार्य करायचे, या मुद्यावरही चर्चा केली.
अमेरिकेची २०२२ मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, डाटा विज्ञान, कृषी, आरोग्य आणि हवामान या क्षेत्रात संयुक्त संशोधनासाठी भारताच्या सहा तंत्रशास्त्र नवोन्मेषी केंद्रात सामील होण्याची योजना आहे.

चीनला शह देण्यासाठी ‘क्वाड’चा नवीन उपक्रम
भारतासह चार देशांची संघटना असलेल्या संघटनेने (क्वाड) हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रातील समुद्री हालचालींवरील निगराणी सुधारण्यासाठी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. चीनच्या वाढत्या दामदाट्यामुळे हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. क्वाड संघटनेच्या नेत्यांनी शिखर परिषदेच्या समोरापात हिंद-प्रशांत महासागर क्षेत्र जागरूकता (आयपीएमडीए) उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली.
सर्व नेत्यांनी मुक्त हिंद-प्रशांत महासागराप्रती कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला, तसेच या क्षेत्रासाठी ठोक निष्कर्षभिमुख उद्देशाने प्रयत्न करण्याचा निर्धार केला. त्यामुळे हे क्षेत्र स्थिर आणि समृद्ध हाेईल.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:05 PM 25-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here