कशेडी घाटात रसायन वाहून नेणार्‍या टँकरला अपघात; एकाचा मृत्यू

0

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात रसायन वाहून नेणार्‍या टँकरला अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. कशेडी घाटातील अवघड वळणावर चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या टँकरचालकाला कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा टँकर गुजरातहून खेड तालुक्यातील लोटे येथील औद्योगिक वसाहतीत जात होता. या अपघातामुळे घाटातील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:42 AM 26-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here