चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गालगत असणाऱ्या चिपळूण पर्यायी रस्त्यवरील खड्डे ४ दिवसांत भरले गेले नाहीत, तर ग्रामस्थ उपोषण करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहे.
या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मोठी वर्दळ असलेल्या लाइफ केअर रुग्णालयाचा मार्गही हाच आहे. त्यामुळे रुग्णांचे जीव धोक्यात टाकले जात आहेत. याच मार्गावर या खड्ड्यांमुळे अपघातही वाढले आहेत. या रस्त्यासाठी भारतीय जनता पार्टीने २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा दिला होता. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामस्थांशी पत्रव्यवहार करून लवकरच या रस्त्याचे काम मार्गी लावणार असल्याचे कळवले होते. परंतु पावसाळा तोंडावर आला असला तरी अजूनही या रस्त्याच्या खड्डे भरण्याच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरवातदेखील केलेली नाही. त्यामुळे आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:19 PM 26-May-22