जमावबंदीचे आदेश मोडणाऱ्यांवर नाईलाजास्तव कारवाई करावी लागेल – आरोग्यमंत्री

0

काल (रविवार) राज्यात लॉकडाऊनची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली. कलम 144 संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आले आहे. पण असे असतानाही आज मुंबई आणि पुण्याच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना लोकांनी गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे. सरकारच्या सूचनांचे जनतेने स्वत:हून पालन करावे. मात्र असे न केल्यास नाईलाजास्तव सरकारला जमावबंदीचे आदेश मोडणाऱ्यांवर कारवाई करावी लागेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here