लालबागच्या राजा मंडळाकडून कोरोनाग्रस्तांसाठी रक्तदान शिबिर; आरोग्यमंत्र्यांकडून कौतुकाची थाप

0

मुंबई : दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. ‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव’मंडळाच्या माध्यमातून आज रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या रक्तदान शिबीराला भेट दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. यावर मात करण्यासाठी राज्यातील तमाम जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले. तसेच या मंडळामार्फत सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता या सर्व नियमांचे पालन करून शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असलेल्या रक्तदान उपक्रमाचे राजेश टोपे यांनी स्वागत केले आणि रक्तदान करणाऱ्या व्यक्तींचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here