राज्यसभेच्या निवडणुकीवर संभाजीराजेंचे चिरंजीव युवराज शहाजीराजे यांची प्रतिक्रिया, म्हणाले..

0

सोलापूर : सध्या चालू असलेल्या घडामोडींमुळे माझ्या आजूबाजूचे लोक टेन्शनमध्ये आहेत. राजेंचे काय होणार? राजे काय करणार आहेत? राजे माघार घेणार की काय?, मात्र या सगळ्यामुळे आमच्या घरात तणावाचे वातावरण नाही. राजकारणाचे टेन्शन रोजच्या जीवनात आणणे, हे मला पटत नाही, असे भाष्य संभाजीराजे छत्रपती यांचे चिरंजीव युवराज शहाजीराजे छत्रपती यांनी सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर केले आहे.

IMG-20220514-WA0009

सोलापूर शहरातील सामाजिक संघटना संभाजी आरमारच्या 14 व्या वर्धापन दिनी शिवपूर्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार संभाजीराजे छत्रपती यांना निमंत्रित केले होते. मात्र, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव युवराज शहाजीराजे छत्रपती या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी युवराज शहाजीराजे छत्रपती हे राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर बोलत होते.

युवराज शहाजीराजे छत्रपती म्हणाले, सध्या चालू असलेल्या घडामोडींमुळे माझ्या आजूबाजूचे लोक टेन्शनमध्ये आहेत. राजेंचे काय होणार? राजे काय करणार आहेत? राजे माघार घेणार की काय. मात्र, या सगळ्यामुळे आमच्या घरात तणावाचे वातावरण नाही. काल रात्रीदेखील मी आणि आई घरात काय साहित्य खरेदी करावे, यावर चर्चा करत होतो. आम्ही कोणत्याही प्रकारच्या तणावात नाही. आमचे रुटीन लाईफ सुरू आहे. मात्र या सगळ्या घडामोडींवरुन लक्षात येत आहे, की संभाजीराजेंबद्दल जनतेच्या मनात किती प्रेम आहे.

राजकारणाचे टेन्शन रोजच्या जीवनात आणणे, हे मला पटत नाही. आम्ही जर खूश नसलो तर लोकांसाठी कसे काम करू, असे म्हणत युवराज शहाजीराजे छत्रपती राजकीय घडामोडींबाबत थेट बोलण्यास नकार दिला. मात्र, आपल्याला राजकारण फार काही कळत नाही, पण काल माध्यमांत बातमी होती की, मावळ्यांमुळे छत्रपती घडतात. पण मला सांगायचंय की छत्रपतीही मावळे घडवतात. ही देवाण-घेवाणीची प्रक्रिया आहे, अशा शब्दात युवराज शहाजीराजे छत्रपती यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले. दरम्यान, मावळे असतात म्हणून राजे असतात, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:54 PM 26-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here