सिंधुदुर्ग सैनिक स्कुल आंबोली येथील प्रवेशासाठी रत्नागिरीत 29 मे रोजी परीक्षा

0

रत्नागिरी : Sindhudurg District Ex Servicemen Association, Sawantwadi संचलित सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली  ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत इ. 6 वी च्या वर्गासाठी एकूण 45 जागा व इ. 7 वी ते 11 वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.

सिंधुदुर्ग सैनिक स्कुल आंबोली यथे प्रवेश घेऊ इ्छिणाऱ्यां रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी रत्नागिरीमध्ये प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा रविवार दि.29 मे 2022 रोजी सकाळी ठीक 11 वाजता ‘यश सिद्धी कोचिंग क्लासेस’ शिर्के प्लाझा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जयस्तंभ, रत्नागिरी येथे होईल.

सिंधुदुर्ग सैनिक स्कुल आंबोली हे महाराष्ट्रातील एक नामवंत सैनिक स्कुल असून येथे आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी प्रशिक्षण दिले जाते.

सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण, उत्कृष्ट निकालाची परंपरा, ,आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय, उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण, निवासी वैद्यकीय अधिकारी सुविधा, NCC Junior Division, करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA,JEE,NEET, MHT-CETइ.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
ही या स्कुलची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

तरी प्रवेश परीक्षा नोंदणीसाठी अथवा अधिक माहितीसाठी भूषण पाटकर 9404395422, दीपक राऊळ 9423304518,
राजेंद्र गावडे 9403366229 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
7:59 PM 26-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here