पंपचालकांचे ३१ मे ला इंधन खरेदी बंद आंदोलन

0

रत्नागिरी : पेट्रोल पंप डीलर्सची एकजूट सरकारला दाखविण्यासाठी आणि जी काही इंधन दर कपातीची रक्कम कमी झाली आहे, ती डीलर्सच्या खिशातून जात असल्याचे ग्राहकांच्या निदर्शनास आणण्यासाठी सर्व डीलर्स अनोखे आंदोलन करणार आहेत. ३१ मे रोजी ऑईल कंपन्यांकडून इंधन खरेदी केले जाणार नाही. मात्र, या आंदोलनाच्या दिवशी पंट्रोलपंप मात्र सुरू राहणार असल्याचे महाराष्ट्र ‘फामपेडा’चे अध्यक्ष उदय लोध यांनी सांगितले.

IMG-20220514-WA0009

केंद्र शासनाने पेट्रोल-डिझेल स्वस्त करण्यासाठी अबकारी करात कपात केली. त्यामुळे पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले. प्रत्यक्षात जो काही वाहनधारकांना दरात दिलासा मिळाला ही रक्कम पेट्रोलपंप चालकांच्या खिशातून गेली आहे. कारण पेट्रोलपंप मालक रोख पैसे देऊन ऑईल कंपन्यांकडून इंधन खरेदी करतात. त्यानंतर अचानक दर कपात झाल्यानंतर ती झळ पंप मालकांना सोसावी लागते. अशा परिस्थितीत सरकारचा उदो उदो होतो. नुकतीच दर कपात झाली आहे याकडे वाहनधारकांचे लक्ष वेधण्यासाठी ३१ मे चे इंधन खरेदी न करण्याचे आंदोलन होणार आहे.

इंधन खरेदी बंद ठेऊन पेट्रोलपंप मालकांची सरकारा एकजुट दाखविण्यासाठीही या आंदोलनाचा उपयोग होणार आहे. पेट्रोलपंप डिलर्सना गेल्या ५ वर्षांत कमिशन वाढवून मिळालेले नाही. हे कमिशन वाढविण्यासाठीही याच आंदोलनाचा उपयोग केला जाणार आहे. मात्र, या दिवशी पेट्रोल पंप चालू राहणार आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:42 AM 27-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here