चीनमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट…?

0

चीनमध्ये कोरोना व्हायरसचा उदय झाला असला तरी इटलीमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. चीनमध्ये उदयास आलेलं कोरोना व्हायरसचं धोकादायक वादळ आता वुहानमध्ये शमलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून दहशत पसरवलेल्या या विषाणूने चीन मध्ये हजारे लोकांचा बळी घेतला आहे. पण आताच्या घडीला वुहानमध्ये एकाही कोरोनाग्रस्त रुग्णाची नोंद झाली नाही. त्यामुळे ही बातमी संपूर्ण जगासाठी दिलासादायक ठरणारी आहे. वुहानने COVID-19 विरूद्धच्या युद्धात विजय मिळवल्याचा दावा जागतिक संघटनेचे महासंचालक ट्रेडोस अदनोम गेब्रेयसस यांनी केला आहे. त्यामुळे वुहान शहराप्रमाणे बाकी देश कधी कोरोना व्हायरच्या विळख्यातून सुटतील हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार. सांगायचं झालं तर चीनमध्ये कोरोना व्हायरसचा उदय झाला असला तरी इटलीमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. न्यूज एजेंन्सी एएफपीच्या वृत्तानुसार शुक्रवारी २४ तासांमध्ये इटलीत ६२७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर या धोकादायक विषाणूमुळे आतापर्यंत इटलीत ४ हजार ३२ जणांचा मृत्यू झाला आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here