पाकिस्तानात १८० रुपये लिटर पेट्रोल; इम्रान खान म्हणाले, ‘भारताकडून काही तरी शिका!’

0

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील शहबाज शरीफ सरकारने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या दबावानंतर पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत ३० रुपयांची वाढ केली. पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माइल यांनी गुरुवारी रात्री या दरवाढीची घोषणा केली. ताज्या दर वाढीमुळे पाकिस्तानमध्ये पेट्रोलच्या किमती १७९.८६ रुपये तर डीझेलच्या किमती १७४.१५ रुपये लिटर झाल्या आहेत. शहबाज सरकारच्या या निर्णयावर माजी पंतप्रधान इमरान खान भडकले असून त्यांनी थेट भारताकडून बोध घेण्याचा सल्ला दिला आहे.

देशातील सरकराने परदेशी संस्थांच्या पुढे झुकण्यास सुरूवात केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती २० आणि ३० रुपयांनी वाढ होत आहे. देशाच्या इतिहासात एका वेळी किमतीत झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. असक्षम आणि असंवेदनशील सरकारने रशियासोबत ३० टक्के स्वस्त दराने कच्चे तेल खरेदी करण्याचा करार पुढे नेला नसल्याचा आरोप इमरान खान यांनी केला.

याउटल भारत जो अमेरिकेचा मित्र देश आहे, त्यांनी रशियाशी स्वस्त तेल खरेदीकरून पाकिस्तानी रुपयात २५ इतके दर कमी केले. आता आपला देश महागाई आणखी एका संकटाचा सामना करेल, असे देखील इमरान खान यांनी म्हटले आहे. पाकिस्तान सरकार सध्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेण्याची चर्चा करत आहे. यामुळेच पेट्रोलियम पदार्थांच्या किमती ऐतिहासिक अशी वाढ करण्यात आली आहे.

अर्थमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारला डीझेल विक्रीतून प्रति लिटरमागे ५६ रुपये इतका तोटा होत होता. आमच्यावर टीका केली जात आहे. पण देशहितासाठी ही गोष्ट गरजेची आहे. जर असे निर्णय घेतले गेले नाही तर पाकिस्तान चुकीच्या दिशेने जाईल.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:45 PM 27-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here