”अनिल परब यांचे ‘तो मी नव्हेच’ नाटक चालणार नाही”

0

मुंबई : “तो मी नव्हेच” या गाजलेल्या नाटकातील कै. प्रभाकर पणशीकर यांच्या भुमिकेनंतर श्री. अनिल परब यांचे आता दापोली रिसॉर्ट घोटाळ्या संबंधात तो मी नव्हेच अश्या प्रकारची भूमिका, नाटक हे एक अभिनय (अॅक्टिंग) आहे असे प्रतिपादन भाजपा डॉ. किरीट सोमैया यांनी केले आहे.

IMG-20220514-WA0009

श्री. अनिल परब यांनी दापोली येथे बेकायदेशीर रिसॉर्ट बांधला ज्याचे बाजार मूल्य २५ कोटींहून अधिक आहे. प्रवर्तन निदेशालय (ईडी) यांनी घातलेल्या धाडी संबंधी “सांडपाणी” साठी ईडीवाले आले होते, असे विनोदी विधान भ्रष्टाचाराची गंगा असलेले श्री. अनिल परबच करू शकतात.

हा रिसॉर्ट श्री. अनिल परब यांचा आहे असा अर्ज २०१९ मध्ये श्री. अनिल परब यांनी शासनाकडे केला होता. त्याच्यावरील घरपट्टी, मालमत्ता कर २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षांचा श्री. अनिल परब यांनी भरला. हा रिसॉर्ट डिसेंबर २०२० मध्ये श्री. सदानंद कदम यांच्या नावावर श्री. अनिल परब यांनी ट्रान्सफर केला. डॉ. किरीट सोमैया यांनी श्री. परब यांना प्रश्न केला आहे की,

१) १६,८०० स्के.फि. च्या रिसॉर्टचे घरपट्टी, मालमत्ता कर नोव्हेंबर २०१९ पासून श्री. अनिल परब भरत आहेत.

२) मालमत्ता कर श्री. अनिल परब भरतात परंतु मालमत्ता/प्रॉपर्टी स्वत:च्या नावाने इन्कमटॅक्स मध्ये व रिटर्न मध्ये दाखवले नाही. रिसॉर्ट बांधण्याचा करोडो रुपये खर्च श्री. परब यांनी आपल्या चोपडा/वाहिखात्यात मध्ये दाखवला नाही. श्री. परब यांनी बेनामी मालमत्ता उभी केली.

३) श्री. अनिल परब यांनी भ्रष्टाचार/गुन्हेगारीचा पैसा रिसॉर्ट बांधण्यासाठी वापरला.

४) २५ कोटींचा रिसॉर्ट केवळ १ कोटी रुपयात शेत जमीन म्हणून मार्च २०२१ मध्ये श्री. सदानंद कदम यांच्या नावावर ट्रान्सफर केला.

५) श्री. अनिल परब यांनी फोर्जरी, फसवणूक, चीटिंग केले आहे व त्यावर कारवाई करण्याचे आदेश, रिसॉर्ट तोडण्याचे आदेश महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारने दिले.

श्री. अनिल परब यांच्या विरोधात पर्यावरण मंत्रालय भारत सरकार, महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (MCZMA), आयकर विभाग, प्रवर्तन निदेशालय (ED) चौकशी व कारवाई करित आहेत.

बेकायदेशीर रिसॉर्ट तुटणार व श्री. अनिल परब यांना शिक्षा होणार असा विश्वास डॉ. किरीट सोमैया यांनी व्यक्त केला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:11 PM 27-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here