राजापुरात आजपासून शिवसंपर्क अभियान

0

राजापूर : राज्यभरात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी तसेच केलेल्या विकासात्मक कामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचून जनतेशी थेट संपर्क साधण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिवसंपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाचा टप्पा-२ राजापूर तालुक्यामध्ये दि. २८ मे व २९ मे रोजी होणार आहे.

त्यासाठी खासदार प्रतापराव जाधव उपस्थित राहणार आहेत. दि. २८ मे रोजी जिल्हा परिषद गट पाचल येथे सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत पाचल सभागृह, ओणी येथे दुपारी १२.३० वाजता गजानन मंगल कार्यालय ओणी, केळवली येथे दुपारी ३.३० वाजता सिद्धांत हॉटेल हॉल पन्हळे, देवाचे गोठणे सायंकाळी ६ वाजता विद्यामंदिर हायस्कूल नाटे येथे होणार आहे.

तसेच दिनांक २९ मे रोजी जिल्हा परिषद गट सागवे येथे सकाळी ११ वाजता जानशी हायस्कूल, कोदवली येथे दुपारी १२.३० वाजता मातोश्री हॉल राजापूर शहर, राजापूर शहर येथे दुपारी २.३० वाजता मातोश्री हॉल राजापूर शहर येथे अभियान होणार आहे.

या दौऱ्यादरम्यान खासदार विनायक राऊत, आ. राजन साळवी, प्रीतम शिंदे, सिद्धेश शिरगावकर, सुधाकर जाधव, महेंद्र इंदुलकर, सुधीर मोरे, राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके आदी उपस्थित राहणार आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:13 AM 28-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here