दापोलीत ईडीची सलग दुसऱ्या दिवशी झाडाझडती; अनिल परब यांच्याशी संबंधित कागदपत्रं ताब्यात

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित मालमत्तांची चौकशी ईडीने सुरु केली असून वर गुरुवारी ईडीचे पथक मुरूड येथे दाखल झाले आहे. दुसऱ्या दिवशीही दापोली मुरुड येथेच हे पथक थांबले होते. मुरूड ग्रामपंचायतीकडून अनिल परब यांच्या नावे असलेल्या काही कागदपत्रांच्या नक्कला ईडीने ताब्यात घेतल्या. रितसर अर्ज करुन मुरुड ग्रामपंचायत कार्यलयात जाऊन ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती शुक्रवारी दुपारी घेतली आहे. यामध्ये एसीसमेंट उतारा, आकारणी आदी कागदपत्रे यांचा समावेश आहे.

या सगळ्या प्रकरणी किरीट सोमय्या यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत काही कागदपत्रे सादर केली आहेत. मुरूड ग्रामपंचायतकडून करण्यात आलेली आकारणी यासाठी असलेला परब यांचा अर्ज आदी कागदोपत्र या सगळ्याच्या प्रती अधिकृतपणे ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे आता एकंदरच या प्रकरणाची उत्सुकता वाढली आहे. हे पथक शुक्रवारी दुपारनंतर परत मुंबईत गेले अथवा नाही याबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.

दरम्यान, ईडीकडून अनिल परब यांची चौकशी सुरु असली तरी अद्याप कोणताही ठोस पुरावा हाती लागला किंवा कसे याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया ईडीकडून आलेली नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर दापोली येथील अनिल परब समर्थक ११ जून रोजी पालकमंत्री अनिल परब दापोली दौऱ्यावर येत आहेत, अशी माहिती परब समर्थकांकडून दिली जात आहे. मात्र, आता दापोली शहरात अनिल परब कोणत्या विकासकामांची भूमिपूजन अथवा उद्घाटन करणार याचीही उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे.

साई रिसॉर्ट प्रकरणी चौकशी सुरू झाल्याने हा विषय अवघ्या महाराष्ट्रात चर्चेचा ठरला आहे. पण या रिसॉर्टशी आपला कोणताही सबंध नाही, असे अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमधील दोन मंत्री ईडीच्या कारवाईनंतर तुरुंगात आहेत. त्यामुळे आता नंबर अनिल परब यांचा त्यानी आता कपडयाची बॅग भरायला घ्यावी, अशा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला होता. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणातील चौकशीची उत्सुकता लागून राहिली आहे. परिवहन मंत्री तथा पालकमंत्री अनिल परब यांच्यावर सुरू असलेल्या ईडीच्या चौकशी अजून किती काळ चालेल हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:52 AM 28-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here