करोना विषाणूमुळे फैलावणाऱ्या ‘कोविड १९’ या आजाराच्या अतिगंभीर प्रकरणांत उपचारासाठी ‘हायड्रोक्जिक्लोरीक्वीन’ (Hydroxychloroquine) या औषधाचा वापर केला जाऊ शकतो, असा सल्ला ‘इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’द्वारे (ICMR) गठीत करण्यात आलेल्या ‘नॅशनल टास्क फोर्स’नं दिलाय. ‘हायड्रोक्जिक्लोरीक्वीन’ या औषधाचा वापर सध्या मलेरियाच्या रुग्णांसाठी औषध म्हणून केला जातो. आता, हेच औषध संशयित किंवा करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या आरोग्य सेवकांना दिलं जाऊ शकतं, असं ‘आयसीएमआर’नं म्हटलंय. याशिवाय करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही हे औषध दिलं जाऊ शकतं, असं सूचित करण्यात आलंय.
