करंबवणेत बचत गटातील महिलांची आरोग्य तपासणी

0

चिपळूण : करंबवणे येथील माधव वासुदेव न्यास, चिपळूणमधील अपरांत हॉस्पिटल आणि कापरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने करंबवणे गावी बचत गटातील महिलांसाठी आरोग्य शिबीर घेण्यात आले.

शिबिरात कृष्णा शिगवण यांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन केले. प्राथमिक आरोग्य केंद्रातील परशुराम निवेंडकर आणि राजीव कांबळे यांनी आरोग्य निरोगी कसे ठेवावे, आहार योग्य पद्धतीने कसा घ्यावा याचे मार्गदर्शन केले. गावातील ११ बचत गटांमधील महिलांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. अनिरुद्ध बेहरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले.

यावेळी सरपंच अनुराधा खळे, माजी सरपंच कृष्णा शिगवण, विश्व हिंदू परिषद आश्रम व्यवस्थापक श्री. वांगीकर, ग्रामसंघ कोषाध्यक्ष श्रेया आयरे, सीआरपी रिया पवार, अपरांत हॉस्पिटलमधील डॉ. रजनीश रेडीज, डॉ. मनोरमा जाधव, राजीव कांबळे, जवाहर चंदनशिवे, नर्सिंग स्टाफ, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here