कोरोनाचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्रातील मोदी सरकारने या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आंतरराज्यातील विमानाची उड्डाणे उद्या मध्यरात्रीपासून बंद करण्यात येणार असल्यामुळे आतंरराज्य विमानांना उद्या रात्री 11.59 मिनिटांपर्यंत सर्व विमानांचे सुरक्षित लॅंडिंग करण्यास सांगण्यात आले आहे. आतापर्यंत देशात 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी आंतरराज्यातील विमान उड्डाणे बंद करण्यात येणार आहे. केंद्र सरकारतर्फे देशभरातील कोरोनाच्या परिस्थितीची माहिती देण्यात आली. देशात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढतो आहे. आतापर्यंत देशात 415 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
