मानेज इंटरनॅशनल स्कूलला सी.बी.एस.ई. बोर्डाकडून मान्यतेचे नूतनीकरण

0

रत्नागिरी : रत्नागिरी येथील मानेज इंटरनॅशनल स्कूल या सी.बी.एस.ई. बोर्डाच्या प्रतिथयश शाळेच्या इयत्ता बारावीपर्यंत मान्यतेचे सी.बी.एस.ई. बोर्डाने पुढील पाच वर्षांसाठी नूतनीकरण केले आहे. अशी मान्यता मिळालेली रत्नागिरी शहरातील मानेज इंटरनॅशनल ही पहिलीच शाळा आहे. सध्या बारावीपर्यंत विज्ञान व वाणिज्य या शाखा सुरु आहेत.

प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष मा.रवींद्रजी माने यांनी शाळेचे अभिनंदन केले. बारावीनंतर घेण्यात येणाऱ्या व्यावसायिक शिक्षण प्रवेशासाठी ( JEE/ NEET/MH-CET इ.) हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरत असल्याने पालकांचा शाळेकडे ओढा वाढतो आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी या उपलब्ध संधीचा फायदा घेऊन आपला भविष्यकाळ उज्ज्वल करावा, असे आवाहन मा.श्री. रवींद्रजी माने यांनी केले आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि दर्जेदार शिक्षण याची खात्री करण्यासाठी सी.बी.एस.ई. बोर्डाने आवश्यक पावले उचलली आहेत. म्हणूनच विविध मानके निश्चित करून व्हीडिओद्वारे पाहणी करून खास संगणक प्रणालीतील विविध टप्प्यांवर कठोर पडताळणी होऊन हे नूतनीकरण झाले आहे.

शाळेच्या कार्याध्यक्षा सौ.नेहा माने यांनीही अभिनंदन करून या कनिष्ठ महाविद्यालयासाठी आवश्यक असणारी प्रशस्त इमारत, सुसज्ज प्रयोगशाळा, डिजिटल क्लासरूम प्रशिक्षित शिक्षकवर्ग या सर्व सुविधांमुळे विद्यार्थ्यांचा उत्कर्ष होईल, याची खात्री दिली. शाळेत अभ्यासक्रमासोबत सीईटी, जेईई आणि नीट या अभ्यासक्रमासाठी विशेष मार्गदर्शन करण्यात येते.

शाळेचे व्यवस्थापक प्रद्युम्न माने आणि प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेचे पदाधिकारी यांनीही शाळेचे अभिनंदन केले. शाळेचे मुख्याध्यापक उल्हास सप्रे यांनी सर्व कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले. रत्नागिरीतच दर्जेदार उच्च शिक्षणाची सोय झाल्याबद्दल पालकवर्गातूनही समाधान व्यक्त होत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
9:13 PM 28-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here