महाराष्ट्र संचारबंदीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महत्त्वाचे निर्णय…

0

संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी म्हणजेच कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्यामुळे लोकांच्या हालचाली पूर्णपणे बंद होणार आहेत. आता कोरोनाशी लढा निर्णायक टप्प्यावर आलाय, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

त्यांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा आणि मांडलेले मुद्दे:

  1. आजपासून राज्यभरात संचारबंदी (कर्फ्यू) लागू.
  2. आता राज्यातल्या सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही.
  3. खासगी वाहनं, बसेस यांची वाहतूक बंद. टॅक्सी, रिक्षा, खासगी वाहनं फक्त अत्यावशक सेवांसाठीच चालतील.
  4. कोरोना विषाणूशी सुरू असलेला लढा आता निर्णायक वळणावर आलाय. हा टर्निंग पॉइंट आहे.
  5. आत्ता रोखू शकलो नाही तर जगभर घातला तसा थैमान कोरोना विषाणू आपल्या इथे घालेल.
  6. जीवनावश्यक वस्तू – अन्नधान्य, औषधं, बेकरी, दवाखाने, पशुखाद्य, बियाणं इत्यादी दुकानं/सेवा सुरू राहणार.
  7. राज्यातली सर्व प्रार्थनास्थळं बंद – पुजारी पूजा करू शकतील, पण लोक जाऊ शकणार नाहीत.
  8. अधिक वैद्यकीय कर्मचाऱ्यांची गरज लागली तर आशा आणि अंगणवाडी सेविका आणि होमगार्डच्या जवानांना प्रशिक्षण दिलं जातंय.
  9. घाबरून जाऊ नका. सर्वांनी मिळून या संकटावर मात करायची आहे. संकट आटोक्यात आहे. आटोक्यात ठेवायचं असेल तर या गोष्टी टाळाव्या लागतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here