करबुडे येथील आंबा बागेत आढळला प्रौढाचा मृतदेह

0

रत्नागिरी : तालुक्यातील करबुडे-धनावडेवाडी येथील आंबा बागेत शनिवारी सकाळी ९.३० वा. प्रौढाचा मृतदेह आढळून आला. या बाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्किम मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बबन भिकाजी जाधव (५२, रा. बौध्दवाडी करबडे, रत्नागिरी) असे मत्य झालेल्या प्रौढाचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाऊ राजकुमार भिकाजी जाधव (५५, रा. बौद्धवाडी करबुडे, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिसांना खबर दिली.

त्यानुसार, शनिवारी सकाळी वैभव सदानंद धनावडे यांनी राजकुमार जाधव यांना आंबा बागेत एका प्रौढाचा मृतदेह सापडून आल्याची माहिती देऊन येऊन खात्री करण्यास सांगितले. त्यानुसार, राजकुमार जाधव यांनी त्याठिकाणी जाउन तो मृतदेह आपल्या भावाचाच असल्याची खात्री करून ग्रामीण पोलिसांना खबर दिली. अधिक तपास पोलिस हवालदार राजवैद्य करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:44 AM 30-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here