आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात सतर्क राहावे; चिपळूण न.प. कर्मचाऱ्यांना सूचना

0

चिपळूण : आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात नियुक्त असताना सतर्क राहावे, सर्व नोंदी व्यवस्थित घ्याव्यात, अशा सूचना चिपळूण पालिकेचे प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, कार्यालय अधीक्षक अनंत मोरे यांनी पालिका कर्मचाऱ्यांना दिल्या. त्याकरिता ३० सप्टेंबरपर्यंत कामावर उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले असून हलगर्जीपणा झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकते याची कल्पनाही दिली.

गतवर्षी आलेल्या महापुरात शहराचे अतोनात नुकसान झाले. कोट्यवधींची हानी झाली. याचा फटका पालिकेलाही बसला. तळमजल्यावरील विभागांची कागदपत्रे भिजली. तसेच संगणकीय यंत्रणाही पाण्यात बुडाली. अनेक इमारतींचे मोठे नुकसान झाले. या हानीसाठी प्रशासनासह पालिकेला जबाबदार ठरविण्यात आले. त्यामुळे यावर्षी पूर आल्यास अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून प्रशासनाने कंबर कसली आहे. दिवसाआड आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका घेऊन कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.

मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी ठसाळे, कार्यालय अधीक्षक श्री. मोरे यांनी १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीसाठी सुरू राहणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात रात्रपाळीसाठी नियुक्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पावसासह नद्यांच्या पाणीपातळीच्या सातत्याने नोंदणी कशा ठेवाव्यात, पाणी भरत असल्यास नागरिक, व्यापारी यांना सतर्क कसे करावे, किती पाणी पातळी झाल्यावर किती भोंगे वाजवावेत, नियुक्त पथक प्रमुखांना माहिती कशी द्यावी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी उद्यान विभागाचे प्रमुख बापू साडविलकर, राजेंद्र खातू, आरोग्य विभागाचे प्रमुख वैभव निवाते, संतोष शिंदे उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:59 AM 30-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here