पंढरपुर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये ॲड. राकेश भाटकर यांचा सपत्नीक सत्कार

0

रत्नागिरी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपुर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोरील कुंभार घाटाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे झालेल्या दुर्घटनेत १४ ॲाक्टोबर २०२० रोजी ६ लोकांचा नाहक बळी गेला होता. संबधित ठेकेदारावर व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई साठी मुंबई हायकोर्टात ॲड. अजींक्य संगितराव यांनी रत्नागिरीचे सुपुत्र ॲड. राकेश भाटकर यांचेमार्फत जनहित याचिका दाखल केली असून संबंधितांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले आहे.

मुंबई उच्च न्यायालयातील सिनिअर अ‍ॅड. राकेशजी भाटकर व त्यांच्या पत्नी सौ. रिद्धी भाटकर यांनी दिनांक 24 मे 2022 रोजी पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी चे दर्शन घेतले. यावेळी महाराष्ट्र शासन संचालित श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर यांच्या वतीने अ‍ॅड. राकेश भाटकर यांचा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सपत्नीक सत्कार व गौरव करण्यात आला.

यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर चे राजशिष्टाचार विभाग प्रमुख श्री. सुधीर घोडके, तहसिल कार्यालय चे कर्मचारी चंद्रकांत वाघमारे, पुंडलिक देवस्थान ट्रस्ट चे माजी अध्यक्ष मारूती संगितराव, अ‍ॅड. अजिंक्य संगितराव व धनंजय शिंदे उपस्थित होते.

तद्नंतर दुसर्‍या दिवशी दिनांक 25 मे रोजी अ‍ॅड.राकेश भाटकर व अ‍ॅड.अजिंक्य संगितराव यांनी पंढरपूर येथील कुंभारघाट दुर्घटनेच्या घटनास्थळी भेट दिली व चंद्रभागा नदीपात्रातील श्री भक्त पुंडलीकाचे दर्शन घेतले.

मुंबई उच्च न्यायालयातील अ‍ॅड. राकेश भाटकर व त्यांच्या पत्नी सौ. रिद्धी भाटकर यांचा पुंडलिक देवस्थान ट्रस्टच्या वतीने सपत्नीक सत्कार व गौरव पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसट यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी पुंडलिक ट्रस्टचे माजी अध्यक्ष श्री.मारुती संगितराव, नगरसेवक अनिल अभंगराव, नगरसेवक विक्रम शिरसट, पुंडलिक ट्रस्ट सदस्य श्री.सतिश नेहतराव, उमेश संगितराव, दत्तात्रय कांबळे,सोनू अधटराव, महर्षी वाल्मिकी संघ अध्यक्ष श्री.गणेश अंकुशराव, शेखर संगितराव, विकी संगितराव सोमनाथ अभंगराव, पुंडलिक व त्याचप्रमाणे सौ रेखा चंद्रराव, सचिन अभंगराव, नितीन अभंगराव व कोळी बांधव उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:12 PM 30-May-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here