whatsapp ग्रुपवर अफवा पसरवल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

0

जैतापूर वार्तालाप या ग्रुपवर खोटा मेसेज टाकून अफवा पसरवल्याबद्दल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ‘साखरी नाटे येथे जाणे टाळावे, नाट्यात कोरोना लागण झालेली व्यक्ती आली आहे” अशा आशयाचा मेसेज पसरवल्या बद्दल हि कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृत माहिती व अफवा पसरवणारे व्यक्ती अथवा संस्था या कायदेशीर व दंडनीय कारवाईस पात्र राहतील अशी अधिसूचना शासनाने याआधीच प्रसिद्ध केली आहे. त्या अंतर्गत हि कारवाई करण्यात आली आहे. गावातून whatsapp वर न्यूज ग्रुप काढून त्याद्वारे अनधिकृतपणे काहीजण चुकीच्या बातम्या व अफवा पसरवत असून या सर्वांवर प्रशासनाने नजर ठेवली असून अशा ग्रुपवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here